QR कोड: स्कॅन म्हणजे पैसे देणं, घेणं नाही
- QR कोड स्कॅन करणं हे पैसे देण्यासाठी असतं. पैसे घेण्यासाठी कधीच स्कॅन करावं लागत नाही.
- फसवणूक करणारे QR कोड पाठवून म्हणतात "पेमेंट किंवा रिफंड मिळवण्यासाठी स्कॅन करा". स्कॅन करून PIN टाकला तर पैसे त्यांच्याकडे जातात.
- दुकानात किंवा पार्किंगमध्ये पैसे देण्याआधी ॲपमध्ये दिसणारं नाव बरोबर आहे का ते पाहा.
लक्षात ठेवाQR स्कॅन = तुम्ही पैसे देताय.